येस न्युज नेटवर्क : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात वाईट काळ पाहणाऱ्या श्रीलंकन जनतेचे हाल संपण्याची चिन्हं नाहीत. श्रीलंकेत इंधन दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइलची श्रीलंकेतील सहकारी कंपनी असलेल्या लंका आयओसीने पेट्रोल-डिझेलच्या दरात 35 टक्क्यांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता श्रीलंकेत डिझेलची किंमत प्रति लिटर 327 श्रीलंकन रुपये झाली आहे
श्रीलंकेच्या बाजारपेठेत लंका आयओसीचा एक तृतीयांश वाटा आहे. तर, दोन तृतीयांश वाटा हा सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा आहे. मात्र, त्यांच्या पेट्रोल पंपावर इंधन नाहीच. कंपनीने मागील आठवड्यात पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याची मुदत निश्चित केली होती. लंका आयओसीनेदेखील तीन आठवड्यांआधी पेट्रोल-डिझेलच्या दरात 20 टक्क्यांची दरवाढ केली होती. स्थानिक चलनाची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे कंपनीने म्हटले.