येस न्युज मराठी नेटवर्क । अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अर्जेंटिना सरकारच्या न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झालेल्या मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. यामधून सावरल्यानंतर ते आपल्या घरी आले होते, तिकडेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या Buenos Aires येथील स्थानिक न्यायाधीशांनी मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भातल्या आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. “काही दिवसांपूर्वी आम्ही मॅराडोना यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे नातेवाईक व जवळीच लोकांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. मॅराडोना यांच्या घरातून जे काही पुरावे मिळाले त्या आधारावर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर लिओपोल्डो ल्युकी यांच्या घराची चौकशी करणं गरजेचं होतं.” अर्जेंटिनाच्या स्थानिक न्यायिक अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना माहिती दिली.