No Result
View All Result
- मुंबई : शुक्रवारी रात्री सुमारे 1 वाजता बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे शेकडो भाविकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी सर्वत्र जय श्री रामचा नारा गुंजत होता. विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तैनात सुरक्षा रक्षकांना मोठी धडपड करावी लागली.
- मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड येथे 18 आणि 19 मार्च रोजी बागेश्वर बाबांच्या दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र विरोध केला असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. धीरेंद्र शास्त्री सतत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा ते महाराष्ट्रात ‘महादिव्य दरबार’ उभारण्यासाठी मुंबईत पोहोचले.आहे. त्यासाठी ते मुंबईत आले आहेत.
- यावेळी देखील बागेश्वर बाबांचा कार्यक्रम वादात सापडला आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात आघाडी उघडली असून, त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या त्यांच्या सत्संग कार्यक्रमावर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला पत्र लिहून धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र हे विकसनशील राज्य आहे, अंधश्रद्धा पसरवणाऱ्याला या राज्यात स्थान नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. काँग्रेस हिंदूंचा आदर करते. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, ते पण हिंदूच आहेत, मात्र भाजप त्यांना का वाचवत नाही?, असे देखील पटोले म्हणाले.
- बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आपल्या कार्यक्रमांतून लोकांची मने जाणून घेण्याचा दावा ते करतात. त्याचबरोबर सनातन धर्माचा प्रचार – प्रसार केल्यामुळे ते अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहेत. असे असून देखील धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमांना लाखोंच्या संख्येने लोक पोहोचतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लाखो लोक त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित असलेले दिसतात.
No Result
View All Result