येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर स्वत: धनजंय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.
“माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे तसेच मला ब्लॅकमेल करणारे आहेत” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान आता माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, अशी मागणी केली आहे.
“धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.