सोलापूर : ठाकरे सरकारमधील आपापसात तील भांडणामुळे या सरकारने अनेक ब्रेकिंग न्यूज दिल्या ..हेडलाईन्स घेतल्या… विविध घोषणा केल्या मात्र आपल्याच विधानावरून या ठाकरे सरकारने पलटी मारल्यामुळे जनतेचा विश्वासघात झाला आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील संग्राम देशमुख यांच्या प्रचार बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य ,. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते खासदार णजितसिंह निंबाळकर,. शहाजी पवार प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.