शासन आपल्या दारी उपक्रम महिन्याला राबवा
सोलापूर : प्रत्येक तालुक्यातील घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. केवळ एका दिवसाचे शासन आपल्या दारी शिबिर न घेता प्रत्येक महिन्याला शिबिर घ्यावे, तलाठ्यांसह अनेक अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आहेत त्यांनी आपले काम लवकरात लवकर सुधारावे खोड्या करू नये, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले
शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध योजनांचे दाखले, प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी महाशिबिराचे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन या मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी क्रमांक २ संतोष देशमुख, तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रपच्या सरपंच अनिता कोरे, माजी सभापती गुरुसिध्द म्हे, हनुमंत कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी माळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित या होते.
कार्यक्रमादरम्यान लोकांमधून एक चिट्ठी आली. त्या चिठ्ठी मध्ये लिहिले होते. अधिकाऱ्यांना ताकीद द्या, याचवेळी तलाठी गावात थांबत नाही, रेशन धान्य मिळत नाही, रेशन कार्ड नाहीत अशा अनेक तक्रारी नागरिकांत पुढे आल्या.