सोलापूर : देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या दिवशी देश का प्रकृती परीक्षण या अभियानाची घोषणा केली. या अभियानाची अंमलबजावणी संविधान दिनापासून म्हणजे 26 नोव्हेंबर पासून चालू झाले आहे. त्या अनुषंगाने शेठ सखाराम नेमचंद जैन ट्रस्ट संचलित शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय व शेठ सखाराम नेमचंद जैन रूग्णालया तर्फे देश का प्रकृती परीक्षण अभियानाला सुरुवात झाली आहे.
या अभियाना अंतर्गत देशातील 18 ते 70 वयोगटातील लोकाचे प्रकृती परीक्षण होणार आहे. नोडल ऑफिसर या नात्याने मी सोलापूर जनतेले आव्हान करतो की आपण आपले प्रकृती परीक्षण करून घ्यावे. त्याकरीता आपण शेठ सखाराम नेमचंद जैन रूग्णालया मध्ये यावे असे आव्हान महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे..
यावेळी या अभियानाला डॉ.वीणा जावळे प्राचार्य, डॉ. शांतीनाथ बागेवडी,उपप्राचार्य, डॉ.आनंद मादगुंडी, डॉ.अविनाश चव्हाण, डॉ.गायत्री देशपांडे, डॉ.शिल्पा येरमे, डॉ.स्मिता गोटीपामुल ह्या उपस्थित होते. या अभियानाला वालचंद कॉलेज ऑफ एम बी ए, कस्तुराबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन , वालचंद कॉलेज ऑफ कॉमर्स व वालचंद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर पासून सुरुवात झाली. या अभियानाचे नियोजन डॉ.जयकुमार सदाशिव आडे नोडल ऑफिसर यांनी केले आहे..