टाकळी खं ( 28 सप्टेंबर 2023) : ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत आलेल्या काॅलेज ऑफ ॲग्रीकल्चर बारामतीच्या चतुर्थ वर्षाच्या विद्धार्थिनी साक्षी बनकर, मयुरी भोंगळे,श्रेया धुमाळ,सिध्दी मुनोत,सेजल मेरगळ,श्रुती नवले,मेघना रायते यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून व त्यांचा खतांवरचा खर्च वायफट जाऊ नये या कारणास्तव भेसळयुक्त खते ओळखण्याचे प्रात्यक्षीत घेतले.
RAWE प्रोग्रामच्या माध्यमातून खतांमध्ये होणारी भेसळ ,चांगलं खत कोणत आहे व भेसळयुक्त खत कोणत आहे, हे कसं ओळखायचं याच्या विविध पद्धती दाखवल्या.या प्रत्यक्षीतामध्ये विध्यार्थिनींनी यूरिया, डी ए पी, एम ओ पी, एस एस पी, कॉपर सल्फेट या खातांमधील भेसळ कशी ओळखावी अतिशय सुंदर असे प्रात्यक्षीत सादर केले.शेतकरी घरच्या घरी सोप्या पद्धतीने या चाचण्या करू शकतो आणि म्हणूनच उपस्थित शेतकरी वर्ग या प्रात्यक्षीतावर समाधानी होते.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कृषीकन्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी.गायकवाड, प्रा.एस.व्ही.बुरुंगले व प्रा.आर. डी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.