सोलापूर : काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला देश पातळीवर चांगलेच कात्रीत पकडले असून मतदान चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे याच पार्श्वभूमीवर सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यदिनी सायंकाळी जोरदार मशाल रॅली काढून लक्ष वेधले.


यावेळी वोट चोरोंसे आझादी, हुकूमशहा से आझादी मतदान चोर, खुर्ची सोड, अश्या घोषणांनी सारा परिसर दणाणहून गेला होता. सोलापूर शहरातील बलिदान चौक येथे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून निघालेली ही रॅली सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ, मेकॅनिकी चौक, प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी चार हुतात्म्यांना अभिवादन करून विसर्जित झाली.


यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो आहोत. जो मतदानाचा अधिकार एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत समान असतो. पण आज तोच मतदानाचा अधिकार चोरला जात आहे. या मातृभूमीची आत्मा ही लोकशाही आहे. आणि जर लोकशाहीच नसेल तर मातृभूमीही टिकणार नाही. मतदान चोरी विरोधात आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदारांना अटक करण्यात आली. हा प्रश्न फक्त विरोधी पक्षांचा नाही, तर हा आपला सर्वांचा आहे. लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे मतदान, आणि तेही जर चोरले गेले, तर आपल्याकडे उरणार तरी काय? म्हणून मी सांगतो, आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत. त्या लढाईसाठी सगळ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. कोणी तरी तुमच्या हक्कासाठी लढतो आहे, आणि त्या लढाईला सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. परवाच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने कश्या प्रकारे मतदान चोरी केली पुराव्यासह दाखवून दिले. त्यांच्या वक्तव्याचा परिणाम देशभर उमटला, देशात मोठी चळवळ उभी राहिली. लोकांचा प्रचंड पाठिंबा व समर्थन मिळत आहे. त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने मी विनंती करतो या देशाला ज्या हुकूमशहाने आपल्या मुठीत ठेवले आहे, त्या हुकूमशाहीच्या विळख्यातून देशाला मुक्त करायचे आहे. या लढाईसाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी पाठिंबा द्या, कारण लोकशाही वाचवणे म्हणजेच देश वाचवणे आहे.
सोलापूर शहर हे हुतात्म्यांचे शहर आहे. चार हुतात्मे आणि शंकर शिवदारे सारख्या अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूरात मार्शल लॉ पुकारला होता. भाजपवाले इतिहास विसरतात त्यांचा इतिहास २०१४ पासून सुरू होतो.
आपल्या देशाचे पंतप्रधान कमकुवत आहेत म्हणून डोनाल्ड ट्रन्फ वारंवार धमक्या देतो टॅरीफ पे टॅरीफ लावत आहे. सोलापुरातील टेक्सटाइल उद्योगाची जवळपास २५० कोटी निर्यात आणि त्याच बरोबर इतर अनेक उद्योगांची निर्यात थांबली आहे. त्याला जबाबदार पंतप्रधान मोदी आहेत. स्व. इंदिराजी गांधींनी ज्याप्रमाणे अमेरिकेला आपला कणखरपणा दाखविला ते मोदींना करता येईना.
यावेळी माजी माहापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, प्रवक्ते प्रा, अशोक निम्बंर्गी, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, नगरसेविका परविन इनामदार, अनुराधा काटकर, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधिरे, सुरेश हावळे, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, दक्षिण तालुका अध्यक्ष भारत जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापूरे, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, ग्राहक संरक्षण सेल अध्यक्ष वैभव पाटील, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, हरूण शेख, प्रा भोजराज पवार, उपाध्यक्ष आबांदास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, हाजी मैनुद्दीन शेख, अशोक कलशेट्टी, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, लखन गायकवाड, गिरीधर थोरात, नागेश म्हेत्रे, कोमारो सय्यद, सचिन गुंड, सिद्राम सलवदे, सागर उबाळे, पृथ्वीराज नरोटे, दिनेश म्हेत्रे, राजेश झंपले, परशुराम सतारेवाले, भीमराव शिंदे, अनिल जाधव, शफी हुंडेकरी, शोहेब महागामी, जुनेद वळसंगकर, सैफन शेख, अरीफ पठाण, सुनील सारंगी, गौतम मसलखांब, नागेश म्याकल, बापूसाहेब घुले, हणमंतु मोरे, अमीर शेख, दत्ता पवार, सुभाष वाघमारे, राजेश झंपले, रमेश फुले, कृष्णा म्हेत्रे, राजू पेद्दी, इरफान शेख, नासिर बंगाली, अजीम शेख, शशिकांत जाधव, सुशीलकुमार म्हेत्रे, समाधान व्हटकर, जितू वाडेकर, राहुल गोयल, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, अभिषेक गायकवाड, आदित्य म्हमाणे, सिद्धार्थ रणदिवे, योगेश रणधिरे, अशितोष वाले, विणाताई देवकाते, शुभांगी लिंगराज, मुमताज ताबोंळी, संघमित्रा चौधरी, रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, मुमताज शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, अँड निशा मरोड, अश्विनी सोलापूरे, चंद्रकला निजमल्लू, अनिता भालेराव, धनलक्ष्मी देशमाने, रमेश जाधव, रफिक चकोले, मल्लेश सुर्यवंशी, गुलाम शेख, आप्पा सलगर, संभा खांडेकर, आबा मिटकरी, चंद्रकांत टिक्के, शिवाजी साळुंखे, कपिल माशाळ, बसू कोळी, सौरभ साळुंखे, शाहू महाराज सलगर, मोहसीन फुलारी, मेघश्याम गौडा, ऐजाज बागवान, रियाज नाईकवाडी, बाबा शेख, नागनाथ शावणे, अभिलाष अच्युकटला, दुर्योधन मस्के, श्रीकांत दासरी, मनोज डिगे, संजय चिखले, संदीप पवार, रामा शिरकुल, गोविंद शिरकुल, गोविंद वरगंटी, दीपक वरगंटी, राजू हुंडेकरी, सुभाष गुडील, सोहेल वाघमारे, सचिन सुरवसे, मौलाली शेख, जीतराज गराड, मशाक मुल्ला, मेहबूब शेख, आयन नाडेवाले, दीपक मठ, अकबर शेख, साई शिंदे, चंदू नाईक, श्रीनिवास कोटा, भैरू पाटील, विजय बालनकर यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.