नवी दिल्ली – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यामध्ये फेरबदल करून सरकारला अपेक्षित परिणाम घडविण्यासाठी, सरकारकडून Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत SIR (special intensive Revision) प्रक्रिया तात्काळ रद्द करा या मागणीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात तीव्र आंदोलन केले.
सदनाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांचे सदस्य घोषणाबाजी करत सभागृहाच्या मध्यभागी उतरले आणि SIR प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली. त्यांनी सरकारवर पक्षपाती आणि निवडक पद्धतीने पुनरिक्षण राबविले आहे आणि अनेक खऱ्या मतदारांची नावे यादीतून काढली जात असून काहींची नावे योग्य पडताळणी न करता यादीत समाविष्ट केली जात आहेत असा आरोप केला.


