सोलापूर : प्रभाग 12 येथील राघवेंद्र नगर येथील स्ट्रीट लाईट पोल (लाईट खांब) चे लोकार्पण आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी MSEB चे अधिकारी दिघे साहेब, पटवेगर साहेब, मुजावर साहेब, राघवेंद्र नगर प्लॉटधारक संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास परकीपंडला, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, लक्ष्मीनारायण द्यावरकोंडा, मोतीलाल कावळे, अशोक हिबारे, सिद्धेश्वर मोने, कृष्णाहरी पोबत्ती, अंबादास कावळे, इरेशम माकम, नागराज परकीपंडला, लक्ष्मण बाईनी, सतीश संगा, मनोहर माचर्ला, अंबादास भंडारी, अनिकेत मादगुंडी, अभिषेक मादगुंडी यांच्यासह या भागातील राहिवासी उपस्थीत होते.
राघवेंद्र नगर नवीन घरकुल रोड येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून सर्व भागात स्ट्रीट लाईत पोल (लाईट खांब) बसविण्यात आले आहे. त्यामूळे येथील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी पूर्ण केली. त्यामूळे संपूर्ण परिसर जुजळून जाणार आहे. अंधाराचे साम्राज्य मिटणार आहे. नागरिकांना सिंगल पेस व थ्रीपेस कनेक्शन घ्यायला सोप्पे होणार आहे. त्यामुळे येथील रहिवाश्यानी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले.