नवीन १९९ व्यक्तींना बाधा, ४१२ कोरोनामुक्त
सोलापूर : जिल्ह्याचा सोमवार दिनांक २१ जून चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत नवीन १९९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ४१२रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत नऊ जणांच्या धोरणामुळे मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्व ११ तालुक्यात नवीन करोना रुग्ण १०० पेक्षा कमी आढळले आहेत . सर्वाधिक रुग्ण माळशिरस तालुक्यात ७६ आणि सर्वात कमी रुग्ण उत्तर सोलापूर तालुक्यात ० आढळले आहेत.
म्यूकरमायकोसिसचे रुग्ण घटले सोलापूर : म्यूकरमायकोसिस चे नवीन रुग्ण जिल्ह्यामध्ये घटले असून आज नव्याने फक्त १ रुग्ण आढळला आहे . सध्या रुग्णालयात १५८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज रुग्णालयातून २ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.