“राज्य सरकारने एक नवीन ईव्ही पॉलिसी म्हणजेच इलेक्ट्रिक वेहिकल पॉलिसी लागू केली आहे. या पॉलिसीमध्ये पॅसेंजर ईव्हींकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ईव्हीचं उत्पादन वाढलं पाहिजे तसेच चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.