सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सोलापूरच्या बँकेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक आहे ही बँक सुस्थितीत आहे. केवळ पराभवाच्या भीतीपोटी सरकारने या बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असा आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे.
राज्य सरकारने नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि सोलापूर या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यातील नागपूर आणि बुलढाणा या बँका डबघाईस आलेल्या आहेत. नाशिकच्या बँकेवर नुकतेच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक दिवसांपासून प्रशासकाची नियुक्ती आहे. या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. महाविकास आघाडी सरकारने पराभवाच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली आहे.