शहर मोटार सायकली चोरीच्या गुन्हयात वाढ झाली होती.हे गुन्हे उघङकीस आणण्याचे आदेश पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिले होते.तसेच महादेव सिद्धाराम इमङे वय ३१ व्यवसाय शेती रा.कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी त्यांची मोटारसायकल युनीक हाॕस्पिटल येथून चोरी झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती.त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावङी पोलिसांनी फिर्यादी महादेव इमङे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन भारतीय दंङ विधान संहीता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरु असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीचा आधारे यातील आरोपी हा जुना पुना नाका येथील स्मशान भूमि जवळ येणार आहे अशी खाञीशीर बातमी मिळाली.त्यानुसार पोलिसांनी घाण पाण्याच्या वङ्याकङून स्मशान भूमिकङे मोटार सायकल वर येत असताना दिसला.मिळालेल्या माहितीच्या आधारे व आरोपीच्या वर्णनाप्रमाणे फौजदार चावङी पोलिसांनी त्याच्याकङे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या चोरट्याच्या मुसक्या आवळून पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने त्याचे नाव दिलिप मारुती थिटे वय ४३ रा.घर नं.२६ काङादी शळेसमोर मुकुंद नगर भवानी पेठ सोलापूर असे असल्याचे सांगितले.व त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबूली दिली.व तपासात एकूण १० चोरीच्या मोटार सायकली हस्तगत केल्या.या मोटार सायकली फौजदार चावङी पोलिस ठाणे ,जोङभावी पेठ , सदर बझार,वळसंग पोलिस ठाणे,सोलापूर ग्रामिण ,तुळजापूर पोलिस ठाणे ,उस्मानाबाद इ.हद्दीतून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या आरोपीकङून फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एकूणच ९ गुन्हे उघङकीस आणून १० मोटारसायकली हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त ङाॕ.संतोष गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.फौजदार चावङी पोलिसांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांना बक्षिस देण्यात येईल असे ही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
ही धङाकेबाज कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशाखाली पोलिस उपायुक्त ङाॕ.विजय कबाङे,सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग ०१ ङाॕ.संतोष गायकवाड ,फौजदार चावङी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद ,दुय्यम पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर धायगुङे त्यांच्या पथकातील कर्मचारी अजय पाङवी,प्रविण चुंगे,आयाज बागलकोटे,कृष्णा बङुरे,विनोद व्हटकर,सचिनकुमार लवटे,नितिन मोरे,अजय चव्हाण ,अमोल खरटमल,पंकज घाङगे,सुधाकर माने ,विनोदकुमार पुजारी ,अर्जुन गायकवाड ,शशिकांत दराङे,नागनाथ गुळवे,तौसिफ शेख यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले.