उजनीतुन सोडलेला कालव्यात विसर्ग केला बंद
बेंबळे(प्रथमेश शिंदे) :- मागील चार दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रातसुरु झालेल्या तुरळक पर्जन्यवृष्टीमुळे पाणीसाठा थोड्या प्रमाणात वाढत चालला आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात गेल्या महिन्यात केवळ चार दिवसातच झपाट्याने वाढ होवुन उजनी -22.43 % वरुन +63%. वर आले होते.मात्र पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनी ने पुन्हा घट होत ते 60% वर आले..परंतु गेल्या चार पाच दिवसात उजनी व त्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केल्याने बंडगार्डन येथुन येणाऱ्या विसर्गात 2451 क्युसेक वरुन तो 8436 क्युसेक झाला असल्याने त्याचा परिणाम दौंड येथुन येणाऱ्या विसर्गात झाला तो ही 3280 क्युसेक वरुन 6034 क्युसेक झाला आहे.
त्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होवु लागली आहे.सध्या उजनी धरण 64.15% झाले आहे..उजनीतुन शेतीसाठी कालव्यातुन सोडलेले पाणी कालपासुन बंद करण्यात आले आहे.पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेले पंधरवाड्यात उजनीत येणारा दौंडचा विसर्ग कमी होत गेला.मात्र बुधवार पासुन पावसाने वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोर धरल्याने वरुन येणाऱ्या विसर्गात वाढ होत आहे.
त्यामुळे दौंड व बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनीचा पाणीसाठ्यात पुन्हा एकदा वाढ होवु लागली आहे.
उजनी धरणातील पाणीपातळी दुपारी 3 वा.
एकूण पाणीपातळी – ४९५.०८५ मीटर
एकुण पाणीसाठा – २७७६.१२ (९८.०२टी.एम.सी)
उपयुक्त साठा – ९७३.३१ दलघमी ( ३४.३१टी.एम.सी.)
टक्केवारी – ६४.१५टक्के
उजनीतील आवक
दौंड – ६०३४ क्युसेक
बंडगार्डन – ८४३६क्युसेक