दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळ्याचे रविवारी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तसेच अभिनेत्री क्रिती सेननला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंहला देखील 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार विजेत्यांची यादी –
सर्वोत्कृष्ट चित्रपट- शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृति सेनन
सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी
फिल्म ऑफ द इयर- पुष्पा द राइज
सर्वोत्कृष्ट वेब सीरीज- कँडी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (वेब सीरीज)- मनोज बाजपेयी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वेब सीरीज)- रवीना टंडन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- विशाल मिश्रा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म- पाउली
बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म- अनादर राउंड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोष
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयाकृष्ण गुममड़ी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्ता
सर्वोत्कृष्ट खलनायक- आयुष शर्मा
पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यु दासानी
पीपल्स च्वाइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राधिका मदान
टेलिविजन सीरियल ऑफ द इयर- अनुपमा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- शाहीर शेख
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- श्रद्धा आर्या
मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर टिव्ही सीरियल- धीरज धूपर
मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्ट्रेस टिव्ही सीरियल- रुपाली गांगुली
क्रिटिक बेस्ट फिल्म- सरदार उधम
क्रिटिक बेस्ट अॅक्टर- सिद्धार्थ मल्होत्रा
क्रिटिक बेस्ट अॅक्ट्रेस- कियारा आडवाणी