मुंबई – बादशाह मसाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या मसाला कंपनीला चांगलीच लॉटरी लागली आहे. कारण देशातील आघाडीची FMCG कंपनी डाबर इंडियाने बादशाह मसाला कंपनीतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, डाबर इंडिया कंपनी बादशाह मसालामधील 51 टक्के स्टेक 587.52 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे.
डाबर इंडियाने बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील 51 टक्के स्टेक घेण्यासाठी करार केला आहे. बादशाह मसाला मिश्र मसाले आणि इतर खाद्यपदार्थांचे उत्पादन निर्यात करते. डाबर इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की फूड सेगमेंटच्या नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या कंपनीच्या धोरणात्मक हेतूनुसार हे अधिग्रहण आहे. म्हणजेच डाबर इंडिया आपला व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे.