सोलापूर – येथील दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलाविष्कार २०२६ हुतात्मा स्मृती मंदीर मध्ये उत्साहात पार पडले.
संगीता पाटील, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. ‘विदयाथ्यांनी मोबाईलच्या आभासात्मक, दुनियेतून बाहेर पडावे आणि माणसं जपावीत, भारतीय संस्कृती जोपासावी असा मोलाचा सल्ला यावेळी संगीता पाटील यांनी दिला.
दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक विजयकुमार उबाळे यांनी पालकांशी संवाद साधला व विद्यार्थी विकास हेच शाळेचे ध्येय असून शाळेच्या प्रगतीत, पालकांनी योगदान द्यावे असे मत त्यांनी मांडले.
कलाविष्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनिषा पाटील यांनी केले विद्याश्याच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीच हा कलाविष्कार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कलाविष्काराची सुरुवात स्वागत गीताने झाली. गणेशवंदना, श्रीकृष्ण-राधा, वीर शिवाजी, सीशंभूराजे यावरील नृत्य तसेच देशभक्तीपर नृत्य, राजस्थानी नृत्य, गरबा, उच्या भरतनाट्यम अशा विविध २५ कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले. २५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. शुभ्रजीत देशमुख याने विविध आवाज काढून कला सादर केली. तर श्रावणी पवार च्या लाठीकाठी प्रकाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षिका सुनीता गवळी, संतोष हंपे कायध्यिता महानंदा चिक्कळ्ळी, पुष्पा शहाणे, अस्लम चांदा, रवी सुरवसे, प्रकाश जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हुमनाबादकर, रीचा वट्टेपल्यी, गायत्री करदास, ज्ञानेश्वरी केत, श्रावणी खरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीनेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर व स्वयंसेवकांनी यांनी प्रयत्न केले.






