येस न्युज मराठी नेटवर्क : भारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाळा संचलित माऊली महाविद्यालय वडाळा येथे आय. क्यू. ए. सी. व महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक चार जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय श्री. हरिभाऊ घाडगे संचालक, भारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाळा हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईल व तत्सम साधनांद्वारे तंत्रज्ञान वापरण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कन्हैया गोसावी व प्रियंका दळवे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना ऑनलाइन सर्चींग, मोबाईल मध्ये वापरले जाणारे विविध ॲप, त्या ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक इत्यादी बाबत माहिती दिली. प्रथमतः iqsc चेअरमन डॉ. विजय म्हमाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विकास शिंदे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सतीश घोरपडे तर आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.