बनावट व्हाॅटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून 42 लाख 10 हजार रुपयांची फसवणुक प्रकरणी साेलापूर ग्रामीण पाेलिसांच्या सायबर पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तपास करून फसवणुक झालेली पूर्ण रक्कम परत मिळवून दिली.
मंद्रुप पाेलीस ठाण्यात 15 ऑक्टाेबर2024 राेजी ऑनलाईन फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयातील तक्रारदार हे व्यवसायिक असुन त्यांना माेतीलाल ओस्वाल इन्वेस्ट क्लब या बनावट व्हाॅटसअप ग्रुपच्या अॅडमिन यांनी संपर्क साधुन त्यांचा विश्वास संपादन केला हाेता. 8 सप्टेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत तक्रारदार यांची अनाेळखी व्यक्तीने सुमारे 42 लाख 10 हजार रुपयांची फसवणुक केली हाेती.


सदर गुन्हयाचा तपास करताना सायबर पाेलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी सुसंगत व तांत्रिक तपास करुन, आराेपीच्या माेबाईल क्रमांकाची, व्हाॅटसअप ग्रुपची, बँक खात्यांची माहिती मिळवुन तक्रारदार यांचे तब्बल 41 लाख 10 हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांना परत मिळवुन दिली. या गुन्ह्यातील आराेपी अद्याप फरार आहेत. या कामगिरीसाठी पाेलिस अधिक्षकांनी सायबर पाेलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बक्षिस देऊन गाैरव केला.
ही कामगिरी पाेलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पाेलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पाेलीस ठाणेचे पाेलिस निरीक्षक विकास दिंडुरे, साेलापूर तालुका पाेलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल देशपांडे, सहायक पाेलिस निरीक्षक राेहिदास पवार यांच्या पर्यवेक्षणाखाली महिला पाेलीस अंमलदार ज्याेती फुलारी, हवालदार अभिजीत पेठे, जुबेर तांबाेळी, युसुफ पठाण, व्यंकटेश माेरे, महिला पाेलिस कर्मचारी अंबरकर, पाेलिस शिपाई स्वप्नील सन्नके, अजित सुरवसे, योगेश नरळे महिला पाेलिस शिपाई रतन जाधव, आशुताेष कुलकर्णी, जहीरान नाईकवाडी यांनी केली.