येस न्युज मराठी नेटवर्क । आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि लगतच्या नऊ गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी राहणार असून या कालावधीत सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. मानाच्या दहा पालख्या एसटी बस मधून वाखरी येथील इथून पंढरपूर पर्यंत प्रतीकात्मक पायी वारी होणार आहे सर्व वारकरी आमच्या rtpcr चाचण्या केल्या जातील तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होताना मंदिरामध्ये 50 पेक्षा कमी लोक असतील असेही ते म्हणाले