येस न्युज नेटवर्क : देशात तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आणि उपाययोजना करण्याचं आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. अशातच जर रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध अटळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढली तर रात्रीची संचारबंदी लावायची की, जमावबंदी लागू करायची? यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाणार? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा आणि राज्यातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या? याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे