५० स्कॅन जवळपास दररोज करण्यात येतील
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नव्याने आलेल्या सीटी स्कॅन मशीनची सेवा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून याचे ट्रायल सुरू होते, यानंतर आता रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

सीटी स्कॅन मशीन १४ कोटी ५० लाख (टर्न की प्रोजेक्ट) रुपयांची असून, ही सर्वात अत्याधुनिक मशीन आहे. यामुळे रुग्णांना आता सीटी स्कॅनसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. यात दररोज जवळपास ५० स्कॅन होतील. यासाठी रुग्णांना १८०० रुपये खर्च येणार आहे. पण ‘एमजेपीजेवाय’मधून मोफत सुविधा मिळेल. या मशीनसाठी ‘डीपीसी’च्या ५० जणांवर कारवाई
काही दिवसांपासून रुग्णांच्या अनेक तक्रारी येत होत्या, यात डॉक्टर नीट पाहत नाहीत, बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात आहे, नर्स चांगली सेवा देत नाहीत, अशा तक्रारी येत होत्या. यात जे कर्मचारी चांगली सेवा देत आहेत, त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. तर दुसरीकडे जे डॉक्टर, कर्मचारी, नर्स कामात कसूर करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे.


माध्यमातून निधी मिळाला आहे. काहींना १८०० रुपये भरणेही अशक्य असते, यासाठी दानशूरांनी पुढाकार घेत निधी जमा केल्यास रुग्णांना फायदा होईल, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले