सोलापूर : सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुमारे 30 कोटी रुपयांची सल्ला फी घेणाऱ्या आणि शहराची वाट लावणाऱ्या क्रिसिल कंपनीची सल्लागार पदावरील नियुक्ती रद्द करावी अशी भूमिका महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घेतली आहे तर दुसरीकडे कंपनीचे सीईओ ढेंगळे पाटील यांनी कंपनीची पाठराखण केली आहे. या क्रिसिल वादामुळे स्मार्ट सिटीच्या कामावर नक्की परिणाम होणार आहे. वास्तविक पाहता महापालिकेने सहकार्य केल्याशिवाय शहरात स्मार्ट सिटी कंपनी शहरात कोणतीच कामे करू शकत नाही मात्र आयुक्तांना विश्वासात न घेता स्मार्ट सिटीमध्ये त्र्यंबक डेंगळे पाटील काही कामे रेटत असल्यामुळे आणि या कामाचा दर्जा नसल्यामुळे आयुक्त संतापले आहेत. क्रीसिल ला सल्लागार पदावरून हटवावे असे पत्र आयुक्तानी केंद्राकडे पाठवले आहे तर क्रिसिल ची नियुक्ती रद्द केल्यास स्मार्ट सिटीतील कामावर परिणाम होईल अशी भीती ढेंगळे पाटील यांनी व्यक्त केली आहे.