सोलापूर : रस्त्यावर वाहने अडवून त्यांना दमदाटी करून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक चार चाकी वाहन तसेच चाहत्याला सह नऊ लाख 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभिजीत खबाले गणेश पवार आणि योगेश जाधव अशी च्या तीन आरोपींची नावे असून तिघेही इंदापूर तालुक्यातील आहेत योगेश जाधव हा यापूर्वीच अटक असून तो जेलमध्ये आहे जून महिन्यात घडलेल्या या गुन्ह्याचा मोठा तपास लागला असल्याची माहिती सातपुते यांनी दिली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पद्भार स्विकारल्या नंतर जिल्हयातील उघडकीस न आलेले गंभीर स्वरूपांचे गुन्हयांचा आढावा घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी जिल्हयातील पोलीस अधिकारी यांची बैठक घेवून सर्वांना आदेषीत केले होते.
स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत, सर्जेराव पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पथक नेमले होते. सदरचे पथक टेंभूर्णी भागात असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीषीर बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इंदापूर तालुक्यातील रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून केला असून ते गुन्हयातील चोरलेली पांढरी स्विफ्ट कार व त्याचा साथिदार हा त्याचे जवळील पल्सर मोटार सायकलसह टेंभूर्णी येथील ग्यानी सरदार ढाबा येथे थांबले असल्याचे खात्रीषीर बातमी मिळाली. त्यानुसार मिळालेली बातमी वरिश्ठांना कळविले असता त्यांनी बातमी प्रमाणे कारवाई करणेकामी सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने मिळालेल्या बातमी प्रमाणे टेंभूर्णी येथील ग्यानी सरदार ढाबा येथे जावून खात्री केली असता ढाब्या समोर एक पांढ-या रंगाची स्विफ्ट कार मागे पुढे नंबर प्लेट नसलेली व तिचे जवळ एक पल्सर मोटार सायकल लावलेली दिसून आली. तेथे स्विफ्ट कारमध्ये दोन इसम बसलेले दिसले, त्यांचा बातमी प्रमाणे संषय आल्याने त्यांना जागीच पकडले. पकडलेल्या संषयित इसमांना गाडीचे कागदपत्राची मागणी केली असता, कागदपत्र नसल्याचे सांगून सदरची कार आज सुमारे पाच महिन्यापूर्वी टेंभूर्णी ते आंबाड ता. माढा जाणा-या रोडवर पल्सर मोटार सायकलने कारचा पाठलाग करून कारचा ताबा घेवून कार वालचंद नगर भागातील निर्जनस्थळी नेवून फिर्यादीची कार, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने चोरले असल्याचे सांगितले. त्यांचे कब्जातून गुन्हयात चोरलेली स्विफ्ट कार व गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटार सायकल व कारमध्ये एक तलवार असा एकूण 9 लाख 51 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचे दोन्ही आरोपी हे रेकाॅर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर इंदापूर पोलीस ठाणेस मालाविशयी व षरिराविशयीचे गुन्हे दाखल असून त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची षक्यता आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मा.अपर पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत, सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोहेकाॅ/ बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, पोना/ बापू षिंदे, लालसिंग राठोड, महिला पोना/ मोहिनी भोगे, पोकाॅ/ अजय वाघमारे, चालक विलास पारधी यांनी बजावली आहे.