येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील सहा मुख्याध्यापक आणि दहा शिक्षकांवर कर्ज थकल्यामुळे मुंबईतील सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीने दावे दाखल केले आहेत. या शिक्षकांनी थकीत कर्ज फेडण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्यास मुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात आणखी 40 शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत प्रक्रिया चालू असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले. सोलापूर शाखेचे अठराशे सभासद असून त्यापैकी सातशे सभासदांनी कर्ज घेतले आहे . त्यापैकी 209 सभासदांचे कर्ज थकले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. थकीत कर्जाची रक्कम सुमारे दोन ते अडीच कोटी असल्याचेही त्यांनी सांगितले.