सोलापूर : कुंभार वेस येथील श्री सिद्धेश्वर पेट्रोल पंप, विजापूर रोड येथील जिगजनी पेट्रोल पंप आणि शांती चौक येथील हिस्सार पेट्रोल पंप व गणेश पेठेतील चडचणकर पेट्रोल पंप याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी केलेल्या आंदोलनानंतर जेल रोड पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, माजी महापौर अलका राठोड भोजराज पवार , अरुण साठे, माजी नगरसेवक अशोक कलशेट्टी, दत्तू बंदपट्टे आदींचा समावेश आहे.