येस न्युज मराठी नेटवर्क ; हवालदाराच्या अंगावर दुचाकी घातल्याने रामलाल चौकात आनंद मेरप्पा मेन शिनोलू या 29 वर्षाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापूजी नगर येथे राहणाऱ्या आनंद याने रामलाल चौकात पोलीस हवालदाराच्या अंगावर मोटार सायकल चालवून सुरक्षिततेस धोका निर्माण केला होता. पोलीस हवालदार राहुल होळकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे . आरोपी आनंद मेनशिनोलू याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 353, 188 ,279 ,336 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 205 चे कलम 51 तसेच साथरोग अधिनियम 897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.