सोलापूर : माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह २० कार्यकर्त्यांवर पूनम गेट समोर आंदोलन करून गर्दी जमलवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आडम यांच्यासह व्यंकटेश कोंगारी, अनिल वासम, मोहम्मद युसुफ शेख, गोविंद सज्जन, अकील शेख, सुरेश गुजरे, दाऊद शेख यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडला होता. सहायक फौजदार दत्तात्रय देवमाने यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. सर्वांनी मिळून पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करून गर्दी केली. विनापरवाना मोर्चा काढला. करोनाचे नियम पाळले नाहीत. जमावबंदीचा आदेश मोडला यामुळे तक्रार देण्यात आली आहे. प्रगती चौक, जवाहर नगर विडी घरकुल येथे राहणारे तुकाराम रमेश गट्टी यांची दुचाकी चोरीला गेली आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी रोजी घडली असून १० फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी घरासमोर दुचाकी लावली होती. चोराने ती पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.