येस न्युज मराठी नेटवर्क : ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकली नंतर भारतीय चाहते निश्चितच आनंदात आहेत आता या आनंदात आणखी भर पडणार आहे गेले वर्षभर कोरोनामुळे भारतात क्रिकेटचे सामने झालेच नाहीत परंतु आता फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष सामने पाहता येणार आहेत कसोटी मालिकेत मैदानाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्याबाबत विचार सुरू असल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळाली तर आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी देखील मैदानावर प्रवेश मिळू शकतो.