येस न्युज मराठी नेटवर्क : पतीने पत्नीचा कौटुंबिक छळ व हिंसाचार करून माहेरी पाठवुन दिल्या प्रकरणी सोलापूर येथील मेहरबान. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी .एस .पी. पाटील यांनी पतीने पत्नीस सव्वा चार लाख रुपये पोटगी देणेचा आदेश केलेला आहे
यात केसची सविस्तर हकिकत अशी की, अक्कलकोट रोड ,सोलापूर येथे राहणारे मधुकर (पती ) (बदललेले नाव) वय 40 यांचा विवाह सौ नीता वय 35 (बदललेले नाव )हिच्याशी सन 2007 मध्ये सोलापूर येथे विवाह झाला .व लग्नानंतर चि. महेश हा मुलगा जन्मला व लग्नानंतर पतीस वाईट व्यसन व दुसरे परस्त्रीशी अनैतिक संबंध ठेवून पती हा पत्नीस अनेक वर्षापासून सतत प्रचंड छळ व त्रास व जाचहाट करणेस सुरुवात केली व पत्नी ही त्यांच्या अनैतिक संबंधात आड येऊ नये म्हणून पतीने पत्नीस अनेकदा शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न सुध्दा केला मग वेळोवेळी भांडण करून अश्लील शिवीगाळ करीत असे व तसेच माहेरून अधिक पैसे व सोने घेऊन ये ,असे म्हणून कौटुंबिक हिंसाचार व अत्याचार करीत होता .अनेकदा पत्नी व त्यांचे माहेरचे लोकसुद्धा पतीस समजावण्याचा प्रयत्न केले असता ,पती ऐकत नव्हता व वागणुकीत बदल झाला नाही शेवटी 2014 मध्ये पत्नी व मुलगा महेश यास घेऊन पतीच्या छळास कंटाळून माहेरी राहु लागले व नंतर अनेकदा पतीचा स्वभाव व वागणुकीत बदल व्हावे म्हणून व चांगले नादवावे म्हणून प्रयत्न केला ,परंतु पतीच्या स्वभावात काही बदल झालेलं नाही, त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव पत्नीने न्याय मिळण्यासाठी सोलापूर येथील मेहरबान. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पती व त्यांच्या इतर कुटुंबियाविरुद्ध कौंटुबिक हिंसाचार कायदा 2005 कलम 12 , 18 , 19 , 20, 21 या अंतर्गत फौजदारी खटला एस. के. लाँ असोसिएटसचे अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सन 2018 केस दाखल केली व मे. न्पायालयाने पती व पत्नी आणि इतर साक्षीदार व पत्नी तर्फे अँड श्रीनीवास कटकुर यांचा युक्तिवाद ऐकुन व ग्राहय धरुन मे. कोर्टाने पत्नीस पाच हजार रूपये व मुलास तीन हजार रुपये सन 2018 पासुनते आजपावेतोचे असे एकुण सव्वा चार लाख रूपये एकरकमी पोटगी व भविष्यात कायमस्वरुपी दरमहा दोचे मिळुन आठ हजार रूपये प्रतिमाह पतीकडुन मिळणार आहेत असा आदेश न्पायाधीश श्री. एस. पी.पाटील साहेब यांनी पतीस केलेला आहे. या कामी पिडीत पत्नी व मुलातर्फे अँड. श्रीनीवास कटकुर व अँड. किरण कटकुर व अँड. आकाश आयंची यांनी काम पाहिले आहे.