सजना चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित असलेल्या हॉटेल भाग्यश्री, हॉटेल ७७७७, हॉटेल तिरंगा, हॉटेल जलपरी यांनी पहिल्यांदाच एकत्रित येऊन मैत्रीचा आणि प्रेमाचा संदेश दिला. तसेच यावेळी हॉटेल भाग्यश्रीचे मालक सपत्निक उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी तमाम प्रेमी युगुलांसाठी एक खास सरप्राईझ देखील दिले. त्यांनी लव्ह मॅरेजवाल्या कपल्ससाठी आपल्या हॉटेल भाग्यश्रीमध्ये कपल्स स्पेशल “सजना थाळी” ! सुरू करणार असल्याची घोषणा केली.
सजना चित्रपटाची क्रेझ आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे. चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा सजना चित्रपट येत्या २७ जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.