सोलापूर : प्रभाग 26 मधील बंडाप्पा नगर येथे हद्दवाढ झाल्यापासून कुठल्याच सुविधा झाल्या नव्हत्या व सेफ्टीटॅंक ओव्हर फ्लो होऊन घाण पाणी रस्त्यावर येत होते त्यामुळे सदर नगरामध्ये दुर्गंधी पसरत होती. व मलेरिया सदृश्य आजार होत होते. तेथील नागरिक वारंवार सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कोणीही दखल घेत नव्हते. तेथील नागरिक नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदरच्या समस्या बाबतीत निवेदन देऊन पाहणी करण्यासाठी विनंती केली होती. नागरिकांच्या विनंतीला मान देऊन नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सदर नगरातील पाहणी करून सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली-उगले यांना सदर समस्या बाबत निवेदन दिले होते त्याची दखल घेत तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी फक्त एका निवेदनात आमचा जटिल प्रश्न सोडवला अशा जनतेसाठी धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या. व केले कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी विजय पगारे, सचिन थोरात, बाळासाहेब जावळे, सिद्धेश्वर जावळे, शरद सतीश सुलाखे, सविता ढेगणे, चंद्रकांत भावे, सागर ठेंगील, अमोल हावळे, परशुराम लवटे, विजयकुमार मालपुरी अदीसह सदर भागातील नागरिक उपस्थित होते.