सोलापूर : सोलापुरात कोरोना चा कहर आता वाढू लागला आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 48 कोरोना चे रुग्ण आढळले आहेत.मोहोळ तालुक्यातील तीन गावातून प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला असून सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 264 वर पोहोचली आहे.
आत्तापर्यंत एकूण 3124 जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील 2972 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2708 निगेटिव्ह तर 264 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी एका दिवसात 132 अहवाल प्राप्त झाले यातील 84 अहवाल निगेटिव्ह तर 48 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटल मधून रूग्णालयातून 12 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटल मधून आजवर 41 जणांना सोडले आहे .आज 9 पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पहा आज कोण कोणत्या भागातून रुग्ण आढळले आहेत – संजीवनगर एमआयडीसी, गजानन नगर जुळे सोलापूर, बजरंग नगर होटगी रोड, सम्राट चौक आंबेडकर उद्यानजवळ, मंत्री चंडक पोलीस कॉलनी, रविवार पेठ, पोलीस वसाहत मुरारजी पेठ, समृध्दी हेरिटेज जुळे सोलापूर, निर्मिती टॉवर मोदी खाना, अश्विनी हॉस्पिटल ग्रामीण कुंभारी, लोकसेवा शाळेजवळ, बुधवार पेठ मिलिंद नगर, तेलंगी पाच्छा पेठ, तुळशांती नगर विडी घरकुल, सिध्दार्थ चौक कुमारस्वामी नगर, निलम नगर, मोदीखाना, गवळी वस्ती कुंभारी रोड, कुंभारी नाका, सिव्हील हॉस्पिटल कॉर्टर, मुलींचे वसतीगृह होटगी नाका, सहारा नगर मजरेवाडी, शिवाजीनगर मोदी या भागात प्रत्येकी कोरोनाचाप्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
मोहोळ तालुक्यातील धाकबाभुळगांव सावळेश्वर आणि पाटकुल या ठिकाणी प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे हे सर्वजण पोलीस आहेत. सोलापूर शहरातील सिध्देश्वर पेठ 8, सदर बझार लष्कर येथे 4 , शास्त्रीनगर येथे 7, हुडको कॉलनी कुमठा नाका 2 रुग्णांचा समावेश आहे.