मुंबई : करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ग्रुपने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे टाटा ग्रुपने एकून १५०० कोटी रुपये करोनाशी लढण्यासाठी दिले आहेत.
यासंदर्भात टाटा सन्सने एक स्टेटमेंटही प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं की, कोविड १९ आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे. नुकतेच, टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.