सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने देखील rt-pcr चाचण्यांवर भर दिला आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी सर्व विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली या बैठकीत त्यांनी रात्रीची संचारबंदी अधिक कडक करावी तसेच शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवाव्यात आदी विविध सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील तसेच कोरोना बाबतचे नियम अधिक कडक केले जातील असे संकेत आहेत.
