येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाचे रुग्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वाढत असताना लसीकरण मोहिमेस फारसा वेग आलेला दिसत नाही . 60 वर्षावरील सर्व व्यक्तींना तसेच ४९ ते ६० वर्षा दरम्यानच्या मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सध्या लसीकरण चालू आहे. महापालिकेच्या दाराशा दवाखाना , सिव्हिल रुग्णालय त्याचप्रमाणे अश्विनी रुग्णालय, यशोधरा , अश्विनी ग्रामीण रुग्णालय, रघोजी किडनी सेंटर अशा खाजगी रुग्णालयांमध्ये covid-19 चे लसीकरण चालू आहे . मात्र अद्याप लोकांना लसीकरण आणि लसीकरणानंतर होणारे परिणाम याबाबत अधिक माहिती करून देणे आवश्यक आहे .सर्वसामान्यांच्या मनात अजूनही लसीकरणाच्या फायद्यांबाबत सजगता असल्याचे दिसून येते. लसीकरण झाल्यानंतर ज्येष्ठांनी विविध ग्रुपमध्ये त्यांचे लसीकरण घेतानाचे छायाचित्र पाठवून अधिकाधिक लोकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे.लसीकरण अधिकाधिक लोकांचे झाले तर कोरोना चा धोका काहीसा कमी होऊ शकतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा सर्वानीच लस घेतलेली आहे. सध्या देशात महाराष्ट्र कोरोना रुग्ण वाढीत आघाडीवर आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने होणे आवश्यक आहे.
