आठ मृतांमध्ये बावीस वर्षाच्या तरुणीचा समावेश
येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर महानगरपालिकेचा covid-१९ चा गुरुवार दिनांक २० मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत ७४ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन परत गेलेल्यांची संख्या १३४ आहे. या कालावधीत शहरांमध्ये आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. शहरातील प्रभागनिहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वाधिक १३ तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. आठ मृतांपैकी उत्तर कसबा परिसरातील पत्रा तालीम जवळ राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे.