सोलापूर : जिल्ह्याचा ४ जून रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये नवीन ४८६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ५२७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोना बाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात १०५, बार्शी तालुक्यात ११६ , पंढरपूर तालुक्यात ७३ आणि माढा तालुक्यात ५९ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे करमाळा , अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला आणि दक्षिण सोलापूर या सात तालुक्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी आहे.

