सोलापूर : शहर व जिल्ह्याचा कोरोनाचा रविवार दिनांक 29 ऑगस्ट चा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी रात्री बारा वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये नवीन 437 तर शहरामध्ये नव्याने आठ अशा 445 व्यक्तींना कोरोना झाला आहे. जिल्ह्यातील 348 व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतले आहेत. तर शहरातील पाच व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. जिल्ह्यामध्ये आठ जणांचा करुणामय मृत्यू ओढवला आहे कोरोना बाधित यांचा आढावा घेतला असता पंढरपूर तालुक्यात 135 नवीन रुग्ण आढळले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. म्युकरमायकोसिसचा आज एक नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.