सोलापूर : महापालिकेचा ६ जून रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नवीन २२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कालावधीत रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या ३६ आहे . दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. सोलापूर शहरातील २८४ व्यक्ती अद्याप रुग्णालयात दाखल आहेत.

