रुग्णालयात अवघे २१९ कोरोना रुग्ण
सोलापूर : शहराचा covid-19 चा गुरुवार दिनांक १० जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात नव्याने १८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे . या कालावधीत कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातील घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १३ आहे . दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या फक्त २१९ आहे.