• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला; हजारहून सक्रिय रुग्णांची नोंद

by Yes News Marathi
March 21, 2023
in मुख्य बातमी
0
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला; हजारहून सक्रिय रुग्णांची नोंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गात वाढ झाली असून सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे.
देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झालेला कोरोना संसर्ग (Covid-19) आता पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सातत्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत आहे.
महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार महिन्यांमध्ये कमी झाली होती. पण, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता कोरोना संसर्गाचे 1,308 सक्रिय रुग्ण असून त्यांचावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 236 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण संख्या 81,39,737 वर पोहोचली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 92 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 79,90,001 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 1.82 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.16 टक्के आहे. राज्यात सध्या 1,308 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. कोणत्या शहरात, किती कोरोनाबाधित?
मुंबईत 52 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत तर, ठाणे शहरातील 33 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पुण्यात 69, नाशिकमध्ये 21, कोल्हापूर आणि अकोल्यात 13-13, औरंगाबादमध्ये 10 आणि नागपुरात 2 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत किमान 3,834 स्वॅब नमुने तपासण्यात आले. महाराष्ट्रात एकूण 8,65,46,719 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील कोविड-19 ची आकडेवारी :
नवीन कोरोना रुग्ण : 236
एकूण कोरोना रुग्ण : 81,39,737
कोरोना विषाणूमुळे मृत्यू : 1,48,428,
कोविड चाचण्या : 8,65,46,719
कोरोनातून बरे झालेले रुग्ण : 79,90,001

Previous Post

किर्लोस्कर सभागृहात 23 मार्च पासून भागवत सप्ताहाचे आयोजन

Next Post

नितीन गडकरींच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन; पोलिसांकडून तपास सुरू

Next Post
नितीन गडकरींच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन; पोलिसांकडून तपास सुरू

नितीन गडकरींच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन; पोलिसांकडून तपास सुरू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group