सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात १५ जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये ७५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे . सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ८१ नागरिकांनी विरुद्ध कारवाई करून ४० हजार ५०० रुपये दंड करण्यात आला. शहर वाहतूक शाखेने १२१ व्यक्तींविरुद्ध चलनाद्वारे कारवाई करून ३४ हजार २०० रुपये दंड वसूल केला. तसेच शहर वाहतूक शाखेने २ व्यक्तींविरुद्ध विना मास्क असल्याने कारवाई करून एक हजार रुपये दंड वसूल केला आहे.