येस न्युज मराठी नेटवर्क ; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा ग्रामीण भागात 51 माढा ग्रामीणमध्ये 45 माळशिरस ग्रामीण मध्ये 55 तर मोहोळ ग्रामीण मध्ये 39 रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यामध्ये होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची संख्या 290 आहे. शनिवारी रात्री संपलेल्या चोवीस तासात प्राप्त झालेल्या अहवालात पैकी 47 जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामध्ये बत्तीस पुरुष 15 स्त्रियांचा समावेश आहे . याच कालावधीत 21 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत त्यापैकी 13 पुरुष व आठ स्त्रिया आहेत. कुर्डूवाडी तालुक्यातील माढा येथील 78 वर्षांच्या महिलेचा बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधा झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अद्याप 158 संभावित बाधितांचे अहवाल प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.