येस न्युज मराठी नेटवर्क : आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४९ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.