येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा २४ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात शहरामध्ये नव्याने ४४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या ७८ आहे. शहरातील केवळ १ व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहे. प्रभागनिहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक ५ रुग्ण आढळले आहेत प्रभाग क्रमांक ३,९,१०,१४,१५,१९ अशा सहा प्रभागांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. महापालिकेच्या मिशन संजीवनी योजनेअंतर्गत शहरातील नागरिकांनी आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्याकडील शिल्लक औषधांचा साठा जमा केला आहे.