येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून गुरुवारी रात्री बारापर्यंत आलेल्या अहवालात एकट्या पंढरपूर तालुक्यात ३०९ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. बार्शी, करमाळा ,,माढा माळशिरस आणि मोहोळ या पाच तालुक्यात शंभरावर कोरोना बाधित असून माळशिरस मध्ये ही संख्या २४४ आहे. जिल्ह्या मधील एकूण नवीन कोरोना बाधित १३०२ असून प्रलंबित तपासणी अहवाल अद्याप ३३५ आहेत .गुरुवारी रात्री १२ पर्यंत संपलेल्या चोवीस तासात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जिल्ह्यात १९ आहे. जिल्ह्यातील ८७६७ व्यक्ती सध्या विविध रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा विचार केला तर अक्कलकोट तालुक्यात चार, करमाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्येकी तीन आणि माढा, मंगळवेढा, पंढरपुर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू कोरोनामुळे ओढवला आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या १४८९ झाली आहे.