सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात १० जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ७३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याने १४० व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्याने तीन आस्थापनांना ३,००० रुपये दंड करण्यात आला.